रिअटर इंडिया कंपनीतील कामगारांचे आंदोलन

पुणे : शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी रिअटर कंपनीचे येरवडा, पुणे येथील कॉर्पोरेट ऑफिस समोर 38 दिवस संपावर असलेल्या कामगारांनी शांततेने व दमदार पद्धतीने आंदोलन केले आंदोलनाच्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत निषेधाच्या घोषणांचे फलक घेऊन आपल्या मागण्यांकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केले.

     बंदोबस्तावर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी करून संघटनेचे निवेदन स्वीकारण्याची सूचना कंपनीचे अधिकारी जोशी यांना केल्यानंतर दुपारी एक वाजता जोशी यांनी व्यवस्थापनाच्या वतीने संघटनेच्या मागण्यांचे निवेदन आंदोलन स्थळी येऊन स्वीकारले.

    वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीचा आदर करून दुपारी एक वाजता आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले.संघटनेच्या मागण्यांचे निवेदन श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुतीराव जगदाळे साहेब व दिलीपराव पवार साहेब व  सी-टू चे नेते अजित अभ्यंकर यांच्या हस्ते व्यवस्थापनाने निवेदन स्वीकारले .