कामगार नेते संजय पाटील यांची बीआरएस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती

कोल्हापूर : हैदराबाद येथील मुख्यमंत्री निवासामध्ये संजय पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. त्यादरम्यान मुख्यमंत्री यांनी जवळपास 40 मिनिटे वेळ देऊन जिल्हा व राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तसेच संघटनात्मक कामाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या होत्या. 

     संजय पाटील यांनी यापूर्वी अखिल भारतीय किसान  काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पद तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद आठ वर्ष सांभाळले होते. शेकडो आंदोलने करून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांनी पदाला न्याय दिला होता . त्यांनी गेल्या तीन महिन्यात पक्ष वाढीसाठी दिलेले योगदान व आजपर्यंत त्यांनी लक्षवेधी आंदोलनातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर केलेला संघर्ष लक्षात घेऊन त्याला संधी देण्यात आलेली आहे. 

     मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या आदेशाने मुख्यमंत्र्यांचे सचिव यांनी संजय पाटील यांना कोल्हापूर जिल्हा बी आर एस पक्षाचे प्रभारी केले आहे असा संदेश दिला आहे. त्यांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र बी आर एस पक्षाचे राज्य प्रभारी के वामशीधर राव, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब देशमुख, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांचे सहकार्य लाभले. मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या नावाची शिफारस त्यांनी केली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे.

     नियुक्ती झाल्यानंतर संजय पाटील म्हणाले ,मुख्यमंत्र्यांबरोबर  झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पक्षाच्या अंतर्गत असणारे नऊ सेल प्राधान्याने ग्रामपंचायतीपासून जिल्हा पातळी पर्यंत बळकट करण्याच्या अनुषंगाने नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी येता येत्या पंधरा दिवसांमध्ये केल्या जातील. त्याचबरोबर सभासद नोंदणी 50 हजार पर्यंत करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.