पुणे: एनआयपीएम च्या २०२३-२०२५ या वर्षाकरिता झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष श्री अमोल कागवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
एनआयपीएम हि एच आर क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून १९८० पासून देशभरातील ५५ चॅप्टर्सच्या माध्यमातून २०००० हुन अधिक एच आर, आय आर, वेलफेयर आणि प्रशिक्षण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी काम करत आहे. संस्थेचे मुख्यालय हे कोलकत्याला असून एशिया पॅसिफिक मधील एच आर संस्थेचे नेतृत्व करत आहे.
अमोल कागवाडे यांच्या कडे एक उत्तम व प्रभावी नेतृत्व म्हणून पाहिले जाते व त्यांनी ते आपल्या नोकरी, व्यवसाय व सामाजिक कार्यातून सिद्ध केले आहे. फिनोलेक्स, हुंदाई, भारत फोर्ज, प्लास्टिक ओमनीयम आणि रेहाऊ पॉलिमर्स या राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एच आर विभागात व्यवस्थापकीय पदावर काम करून आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. तसेच रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड या क्लबचे देखील ते अध्यक्ष ते आहेत. व्यावसायिक जीवनात त्यांनी खूप कमी कालावधीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
एनआयपीएम पिंपरी चिंचवड , चाकण व पुणे चॅप्टर्सच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे या निवडीसाठी त्यांचे अभिनंदन करून
त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकीर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.