सीआयई ॲटोमोटीव्ह इंडीया लि. भोसरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

पिंपरी चिंचवड : शुक्रवार दि. 22 / 09 /2023 रोजी सीआयईॲटोमोटीव्ह इंडिया लि.भोसरी युनिट येथे  गणेशोत्सवा निमित्ताने  कामगार कल्याण केंद्र चाकण यांचे माध्यमातून   "रक्तदान शिबीर" आयोजित केले होते  होते. शिबीरामध्ये 126 कामगारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. एकूण 160 कामगार वर्गाने सहभाग नोंदवला. तज्ञ डाॅक्टर दत्तात्रय राऊत यांनी रक्तदानाचे महत्व कामगार वर्गाला सांगितले. तसेच हिमोग्लोबीनची कमतरता या बाबतही मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाचे उद्घाटन कंपनीचे प्लॅन्ट हेड अनिल खेडकर, मनुष्यबळ विभागप्रमुख बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पडवळ, कुलदीप बिस्ट यांच्या हस्ते करण्यात आले. सीआयई ॲटोमोटीव्ह इंडीया लि. गणेश मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांस एक सॅक व प्रमाणपत्र तसेच ट्राफी देण्यात आली. युनियन प्रतिनिधी दत्तात्रय धावडे, सुभाष जमादार, ज्ञानेश्वर कळमकर, दिपक अरगडे व कृष्णदेव थोरात यांनी या शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश राऊत केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र चाकण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.