पुणे : सॅन्डविक एशिया एम्प्लॉईज यूनियनला 3 सप्टेंबर 2023 रोजी 50 वर्ष पुर्ण झाली. दि.17/09/2023 रोजी सॅन्डविक एशिया एम्प्लॉईज यूनियनचा ऐतिहासिक सुवर्ण मोहोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम रागा पॅलेस याठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला.
इंडस्ट्रीऑल ग्लोबल युनियन च्या रिजनल सेक्रेटरी अपुर्वा कैवार मॅडम ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्रमास उपस्थित होत्या. सॅन्डविक कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते.
संघटनेचे सर्व कर्तबगार माजी अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी, ज्यांनी संघटनेचे रोप लावले आणि वाढवले ते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते यामध्ये रूबेन सोलोमन, अशोक गडकरी, अंथॉनी मॅनेजीस, शरद पाटील, एल एस डिसोझा, मारुती जगदाळे, बी टी भालेराव, गुल ईदनांनी, अशोक भाई सोनवणे, प्रसाद भुरेवार, सतीश लोणकर, के सी चेरीयन, पांडुरंग मोहिते हे उपस्थित होते.
नामवंत संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी आले होते त्यामध्ये SKF बेरिंग इंडिया एम्प्लॉईज युनियन, अटलास कॉपको एम्प्लॉईज फेडरेशन, किर्लोस्कर कमिन्स युनियन, रिएटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन, मॅथर अँड प्लांट एम्प्लॉईज युनियन, सेको टूल्स कामगार संघटना, जनरल मोटर्स कामगार संघटना, अल्फा लावाल कामगार संघटना, प्रीमियर एम्प्लॉईज युनियन, सुल्झर कामगार संघटना, थरमॅक्स कामगार संघटना, जे.एफ.शोजी स्टील कामगार संघटना, ह्युंदाई एम्प्लॉईज युनियन या संघटनांचे अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी तसेचश्र मिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी हे देखील उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी विनंतीला मान देऊन उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सॅन्डविक एशिया एम्प्लॉईज यूनियनच्या वतीने सर्वांचे अगदी मनापासून आभार मानण्यात आले.
सॅन्डविक एशिया एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष संतोष कणसे यांनी प्रास्ताविक केले, नितीन पवार यांनी आभार प्रदर्शन केले. मॅथर अँड प्लांट एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष विकास कर्पे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. गर्जा महाराष्ट्र माझा' ह्या श्री अरुण गायकवाड यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.