आज भव्य कामगार मेळावा


श्रमिक एकता महासंघातर्फे औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांसाठी आवाहन

पिंपरी : श्रमिक एकता महासंघ आयोजित महाराष्ट्र राज्य कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियन, रिअटर इंडिया एम्पलोयीज फेडरेशन आणि जी. के. एन. कामगार संघटना यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात व सरकारच्या कामगार विरोधी धोरणाबाबत भव्य कामगार मेळावा चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

   या मेळावा माध्यमातून सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कामगारांना आवाहन करण्यात येणार आहे की, कामगार चळवळीच्या दृष्टीने जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियन (तळेगांव), रिएटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन (शिरवळ) व जी के.एन. सिंटर महिंद्रा कामगार संघटनाच्या (पिंपरी) संघर्षा मध्ये कामगार चळवळीचे अस्तित्व आबादीत ठेवत, कामगारांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

   तरी या कामगार मेळाव्यास सर्व कामगारांनी उपस्थित रहावे आणि आपल्या सभोवतालच्या इतर कामगारांना कम्युनिकेशन करून उपस्थित राहण्यास सांगाणे असे आवाहन श्रमिक एकता महासंघ यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

     या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन डॉ. कैलासभाऊ कदम अध्यक्ष - इंटक, पुणे जिल्हा महाराष्ट्र कृती समिती, कॉ. मानवजी कांबळे सामाजिक कार्यकर्ते, डॉ. डी. एल. कराड अध्यक्ष सीआयटीयू महाराष्ट्र राज्य, डॉ. रघुनाथ कुचिक अध्यक्ष किमान वेतन महामंडळ, अरविंद श्रोत्री ऑप्शन पॉझीटीव्ह,  कॉ. दिलीप पवार अध्यक्ष विश्वकल्याण कामगार संघटना, यशवंतभाऊ भोसले अध्यक्ष राष्ट्रीय श्रमिक आघाडी,  काशिनाथ नखाते अध्यक्ष कष्टकरी संघटना तसेच ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड.संजय सिंघवी मुंबई उच्च न्यायालय, ॲड. नितिन कुलकर्णी मुंबई उच्च न्यायालय,ॲड. राहुल कामेरकर मुंबई उच्च न्यायालय,  कॉ. अजित अभ्यंकर अध्यक्ष सीआयटीयू, पुणे, कॉ. मारुती जगदाळे सल्लागार श्रमिक एकता महासंघ, भरतदादा शिंदे कामगार नेते, प्रमुख पाहुणे म्हणून केशव घोळवे मा. उपमहापौर, पिं.चिं.मनपा, मारुती भापकर मा. नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत.

     तसेच या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनिल अण्णा शेळके, संजय उर्फ बाळा भेगडे मा. कामगार राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत अशी माहिती श्रमिक एकता महासंघ यांच्याद्वारे देण्यात आली.