नाशिक : रोथे एर्डे कंपनीतील कमी केलेल्या कामगारांनी कंपनीच्या दडपशाही विरोधात सुरू असलेल्या आंदोलन स्थळी इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर व सी. आय. टी. यु. चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉ. डी. एल. कराड यांनी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली असे वृत्त महाराष्ट्र जन्मभूमी वृत्तसंस्थेने दिले आहे.

    डॉ. डी. एल कराड म्हणाले, कामगारांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून व एकजुटीच्या मार्गानेच न्याय मिळवून घेता येईल, त्यामुळे सिटू सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर आमदार हिरामण खोसकर यांनी कामगारांना पाठिंबा देऊन सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन करून कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.

    यावेळी उपस्थित सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, कॉम्रेड युवराज पाटील, कॉम्रेड गौतम कोंगळे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.