चाकण : येथील औद्योगिक वसाहतीमधील शिंडलर इंडिया प्रा.लिमि (Schindler India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि शिंडलर इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये दिनांक 7 जून 2023 रोजी तिसरा वेतनवाढ करार संपन्न झाला आहे.
कराराची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
करार कालावधी : सदर करार तीन वर्षासाठी असुन कराराचा कालावधी दिनांक 01/04/2023 ते 31/03/2026 पर्यंत असेल.
पहिल्या वर्षी 60% Rs-12911/-
दुसऱ्या वर्षी 20% Rs-4300/-
तिसऱ्या वर्षी 20% Rs-4300/-
फरक : दिनांक 1 एप्रिल 2023 पासून आतापर्यंतचा 100% फरक देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
कँटीन : मेनु मध्ये वाढ करून दररोज दुध आणि अंडी देण्यात येतील
युनियन ऑफिस : कंपनी आवारात युनियन ऑफिस देण्याचे मान्य केले आहे.
बिनव्याजी कर्ज : या आधी कामगार बंधूंना एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येत होते ते आता दोन लाख करण्यात आले आहे त्याची परतफेड 36 समान हप्त्यात करण्यात येईल.
मेडिक्लेम पॉलिसी : तीन लाखावरून चार लाख करण्यात आली आहे.
कामगार सहल : दोन वर्षातुन एक वेळेस कामगार सहल (1 day Trip) मान्य करण्यात आलेली आहे.
गंभीर आजारपणाच्या रजा : एखाद्या कामगारास गंभीर आजार झाल्यास कंपनीकडून त्या कामगारास 75 दिवस पगारी रजा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे
इतर: दसरा सणाला अर्धा किलो ड्रायफूट तसेच दिवाळी सणाला अर्धा किलो काजू कतली देण्यात येणार आहे.
दोन वर्षातून एक वेळेस हिवाळी जॅकेट देण्यात येतील.
GTLपॉलिसी- कंपनी पॉलिसी प्रमाणे असेल.
या आधी (PL)लिव्ह घेण्यासाठी चार वेळेची मर्यादा होती आता ती हटवण्यात आली आहे.
दरवर्षी इंडस्ट्रियल क्रिकेट टूर्नामेंट मध्ये सहभाग घेण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
फॅमिली डे वर्षातुन एक वेळेस घेण्यात येईल.
दरवर्षी स्पोर्ट डे घेण्यात येईल.
उत्पादन वाढ : युनियनकडून 2023-24 मध्ये 8%, 2024-25 मध्ये 4%, 2025-26 मध्ये 4% इतके उत्पादन वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
करार स्वाक्षरी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापना कडून अनुज दत्ता (CSCO), पार्थ कुलकर्णी (HR व्हॉइस प्रेसिडेंट), सुमित गुप्ता, मिथिलेश, अंजली साळवी तसेच युनियन तर्फे अध्यक्ष निलेश तानकर, उपाध्यक्ष अमोल देशमुख, जनरल सेक्रेटरी प्रवीण कांबळे, खजिनदार राहुल काळे, सह जनरल सेक्रेटरी अमोल ताजने, सदस्य जितेंद्र भोसले, किसन राऊत उपस्थित होते.
वेतन करार यशस्वीरिता संपन्न होण्यासाठी श्रमिक एकता महासंघ तसेच राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती युनियन वतीने देण्यात आली.