नाशिक : दिंडोरी तालुक्यातील हेक्सागॉन न्यूट्रिशन लिमिटेड या कंपनीत त्रैवार्षिक करार करण्यात आला .या करारानुसार कामगारांना रुपये 11500/- वेतन वाढ, शासनाच्या परिपत्रकानुसार महागाई भत्ता, वर्षात एकूण 34 सुट्ट्या, कामगार व कुटुंबासाठी दीड लाख रुपयांचा मेडिक्लेम, कामगारांसाठी तीन लाख रुपयाचे अपघाती विमा ,तसेच दरवर्षी एक महिन्याच्या वेतना इतका बोनस इत्यादी लाभ मिळणार आहेत असे वृत्त इंडिया दर्पण वृत्तसंस्थेने दिले आहे.
यामुळे कामगारांचे वेतन दरमहा 35 हजार रुपये होणार आहे. तसेच कामगारांना वेतन वाढीचा फरकही मिळणार आहे. सदर करार तीन वर्षाचा आहे. करारावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने डेप्युटी जनरल मॅनेजर श्री संदीप रायते, एच आर मॅनेजर तुषार कातकाडे, प्रोडक्शन मॅनेजर सुभाष तांबे, अकाउंट मॅनेजर श्री अशीष चपके, युनियनच्या वतीने सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड ,उपाध्यक्ष का. सिताराम ठोंबरे, जनरल सेक्रेटरी तुकाराम सोनजे, का. देविदास आडोळे, का संतोष कुलकर्णी, का संतोष काकडे ,का. भिवाजी भावले, का हिरामण तेलोरे व कमिटी सदस्य कामरेड अरविंद जगताप, उमेश जगताप, नानासाहेब ढुमणे, राजेंद्र जाधव यांनी सह्या केल्या. सदर करारामुळे कामगार व कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
