घरेलू कामगारांना माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सन्मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी ३१ मे २०२३ पूर्वी  कामगार उपायुक्त कार्यालयात समक्ष हजर राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे.

    शासनाकडून ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या आणि घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ३१ डिसेंबर २०२२ अखेर नोंदीत कामगारांना कामगार सन्मानधन योजनेअंतर्गत १० हजार रुपये मिळणार आहेत. त्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालय, शक्ती चेंबर्स, सर्वे क्र. ७७/१,  २ रा, 3 रा आणि ४ था मजला, संगमवाडी पुणे-४११००३ येथे हजार राहून अर्ज सादर करावा.

    अर्जासोबत प्रपत्र अ, बँकेच्या पासबुकची सत्यप्रत, लाभार्थ्यांच्या ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या नोंदणीची किंवा नूतनीकरणाच्या पावतीची सत्यप्रत आणि आधारकार्डची सत्यप्रत सादर करावी, असेही कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.