ब्ल्यू स्टार येथे वेतनवाढ करार संपन्न

वाडा : येथील ब्ल्यू स्टार लिमिटेड येथे काम करणाऱ्या कामगारांना सीटीसी 13 हजार 950 रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. हा करार भारतीय कामगार सेना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यादरम्यान तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे असे वृत्त सामना वृत्तसंस्थेने दिले आहे.

     या कराराद्वारे वरील रकमेच्या 40 टक्के रक्कम पहिल्या वर्षाकरिता, 38 टक्के रक्कम दुसऱया वर्षाकरिता आणि 22 टक्के रक्कम तिसऱ्या वर्षाकरिता विभागून देण्यात आली आहे. तसेच कामगारांना सध्या मिळणाऱ्या सीएलमध्ये एक दिवसाची वाढ व महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. कामगारांना मिळणाऱ्या सध्याच्या सोयी-सवलती यापुढेदेखील मिळणार आहेत. 

    या करारावर भारतीय कामगार सेनेच्या वतीने अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी तसेच कंपनीतर्फे सीनिअर जनरल मॅनेजर सुशील देशपांडे, जनरल मॅनेजर (एचआर) मंगेश वाळवे, डिपार्टमेंट जनरल मॅनेजर प्रवीण टेटे, जनरल मॅनेजर (एचआर) संजय येरुणकर, असिस्टंट मॅनेजर विशाल सावंत तसेच युनिट कमिटीतर्फे अध्यक्ष किरण मालप, उपाध्यक्ष योगेश पाटील, चिटणीस शहनवाज मन्सुरी, खजिनदार गणेश पाटील, कमिटी सदस्य सुधीर पठारे, नितीन तरे, नीलेश गोळे यांनी सह्या केल्या.