मिंडा वास्ट ॲसेस सिस्टम प्रा.लि.(Minda Vast Access Systems Pvt. Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : चाकण पुणे MIDC येथील मिंडा वास्ट ॲसेस सिस्टम प्रा.लि.(Minda Vast Access Systems Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि मिंडा वास्ट एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये तिसरा वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

करार कालावधी : कराराचा कालावधी 3 वर्ष असेल ( दि.1 जुन 2022 ते दि.31 मे 2025)

एकूण पगार वाढ : अप्रत्यक्ष रु.17,000/- तसेच प्रत्यक्ष रु.14,000/- रूपये एवढा झाला आहे.
प्रथम वर्ष : रु.4200/-
दुसरे वर्ष : रु.6300/-     
तिसरे वर्ष : रु.3500/-

फरक रक्कम : दि.1 जुन 2022 पासून ते 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत रु.25000/- एक रकमी देण्याचे मान्य करण्यात आले.

दिवाळी बोनस : बोनस ऍक्ट 1965 प्रमाणे मिळेल

GPA policy : रु.3,00,000/- असेल

मेडिक्लेम पॉलीसी : रु.1 लाख ( बफर रु.2 लाख) लागु असेल

स्नेहसंमेलन : वर्षातुन एकदा गेट टु गेदर (ॲनुअल डे) साजरा करण्यात येईल.

लाँग टाईम सर्विस पुरस्कार , बस , सुसज्य कॅन्टीन इतर सेवा व सुविधा ,व गणवेश, मृत्यू सहायता निधी, हे पूर्वी प्रमाणे सर्व लाभ चालू राहतील.

    सदर करारावेळी कंपनीच्या वतीने ग्रुप चिफ जितेन्द्र सिंग, एक्सीकेटीव्ह प्रेसिडेन्ड विनय पटवर्धन, लिड.ऑपरेशन प्रशांत बोडके, HR हेड युवराज थोरात, एमई हेड रविंद्र पाटील, दत्तात्रय पवार तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रमोद खुळे, सचिव राहुल कुटे,उपाध्यक्ष दिपक गाडे, खजिनदार संदीप बानेकर, उपाध्यक्ष मनोज फसले, सहसचिव सचिन अंधारे, सहसचिव रोशन उपाध्ये, कमिटी सदस्य मोबीन शेख, श्रीकृष्णा टीकारे उपस्थित होते.

    हा करार संपन्न करण्यासाठी मा.राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, कामगार नेते दत्तात्रय येळवंडे, उपाध्यक्ष राजु आण्णा दरेकर, निरज कडू, अविनाश वाडेकर, गणेश जाधव, राकेश चौधरी, प्रहार पक्षाचे शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, प्रहार पक्षसरचिटणीस पिंपरी चिंचवड रामभाऊ कुकडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष संदीप जाधव यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खुप मोलाचे सहकार्य मिळाले.

   सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्य प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली .