राज्यातील "अभियांत्रिकी उद्योगातील रोजगार (Engineering Industry)" यामधील सुधारित मूळ किमान वेतन अधिसूचना दि.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाली असून या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.
महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना याउपर (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो.
राज्यातील "अभियांत्रिकी उद्योगातील रोजगार (Engineering Industry)" कामगारांना दर महिन्याला किमान वेतन कायदा, १९४८ (The Minimum Wages Act, 1948) नुसार खालील प्रमाणे किमान वेतन मिळणे गरजेचे आहे -
१) कुशल कामगार : १६,४५०/- + ३७२/- = १६,८२२/-
२) अर्ध कुशल कामगार : १५,०२५/- + ३७२/- = १५,३९७/-
३) अकुशल कामगार : १४,०१०/- + ३७२/- = १४,३८२/-
१) कुशल कामगार : १६,०४५/- + ३७२/- = १६,४१७/-
२) अर्ध कुशल कामगार : १४,६२०/- + ३७२/- = १४,९९२/-
३) अकुशल कामगार : १३,६०५/- + ३७२/- = १३,९७७/-
१) कुशल कामगार : १५,२२५/- + ३७२/- = १५,५९७/-
२) अर्ध कुशल कामगार : १३,८०५/- + ३७२/- = १४,१७७/-
३) अकुशल कामगार : १२,७९५/- + ३७२/- = १३,१६७/-
व्याख्या :
परिमंडळ १ - महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीमधील सर्व क्षेत्र तसेच महानगरपालिका क्षेत्रापासून २० कि.मी पर्यंत औद्योगिक क्षेत्र
परिमंडळ २ - महाराष्ट्र राज्यातील सर्व 'अ' व 'ब' 'क' वर्ग नगरपालिका/नगरपरिषद क्षेत्र तसेच छावणी क्षेत्र
परिमंडळ ३ - परिमंडळ १ व परिमंडळ २ सोडून सर्व क्षेत्र
टीप - विशेष भत्ता रक्कम दर सहा महिन्याला बदलली जाते त्यानुसार मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रकम = किमान वेतन रक्कम गणली जाते.
राज्यातील "अभियांत्रिकी उद्योगातील रोजगार (Engineering Industry)" यामधील सुधारित मूळ किमान वेतन अधिसूचना दि.२१ नोव्हेंबर २०२२ पाहण्यासाठी - क्लिक करा