शिरुर : येथील रांजणगाव MIDC मधील पी. व्ही. सन्स कॉर्न मिलिंग प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील कामगार दिनांक दि.13/1/2018 पासून प्रलंबित असलेल्या वेतन करार व खोट्या आरोपाखाली कामगार निलंबित करणे या निषेधार्थ कामगारांनी दिनांक 15/9/2022 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
गेल्या 98 दिवसापासून आंदोलन चालू आहे कंपनी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही यादरम्यान कामगार आयुक्त व कंपनी प्रशासन त्यांच्यासोबत अनेक चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठलाही समाधानकारक तोडगा काढला गेला नाही. त्यामुळे दिनांक 19/12/2022 पासून कामगारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
