मुंबई : नवीन मंत्रिमंडळ शपथविधी पार पडल्यानंतर कामगार मंत्री म्हणून सुरेश खाडे यांच्या कडे कार्यभार देण्यात आला आहे.
आमदार डॉ. सुरेश दगडू खाडे यांचा जन्म १ जून १९५८ रोजी झाला. वेल्डिंग डिप्लोमा असे त्यांचे शिक्षण झालं आहे. तसंच कोलंबो युनिव्हरसिटी येथून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. सुरेश खाडे हे २००४ साली पहिल्यांदा जत मतदारसंघामधून निवडून आले. त्यानंतर मिरज मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी विधानसभा गाठली. २०१९ मध्ये भाजपा-सेना युती सरकारमध्ये त्यांनी चार महिन्यांसाठी समाजिक न्यायमंत्री म्हणून काम पाहिलं आहे.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या समोरील आव्हाने :
महाराष्ट्रातून नवीन कामगार कायद्यांच्या तरतुदींना प्रचंड विरोध आहे, कोरोना कालावधी मध्ये कमी केलेले कामगार यांचा ज्वलंत प्रश्न राज्यामध्ये उभा आहे तसेच बहुसंख्य उद्योगातील किमान वेतन पुनर्निर्धारित झालेले नसून त्याबाबत निर्णय घेणे, राज्यामध्ये विविध कामगार योजना प्रभावीपणे राबविणे.