नविन कामगार कायदे धोरणाविरोधात प्राणांतिक उपोषणला वाढता प्रतिसाद

पुणे : कामगार नेते, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांचे नविन कामगार कायदे धोरणाविरोधात प्राणांतिक उपोषण कामगारांच्या उपस्थितीत दि. १० ऑगस्ट रोजी पासून कामगार आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे करत असून आज उपोषणाचा ६ वा दिवस असून कामगार वर्गामधून यास प्रतिसाद वाढत आहे.

    कामगारांच्या हिताच्या विरोधातील कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, कंत्राटी पद्धत बंद करावी, कायम कामगारांच्या संघटनेचे अधिकार अबाधित रहावे, २४० दिवस होताच कामगार परमनंट व्हावेत, कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये काढलेल्या कंपनीतील कामगारांना कामावर हजर करून घ्यावे याकरिता महाराष्ट्र राज्याचे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले हे प्राणांतिक उपोषण केले आहे. या उपोषणाची दखल त्वरित मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नवनियुक्त कामगार मंत्री सुरेशजी खाडे यांनी घ्यावी अशी मागणी विविध कामगार संघटना व कामगार क्षेत्रातून होत आहे.

    आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून उपोषणास पाठिंबा देण्यास मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग व कामगार संघटना येणार असल्याची माहिती मिळत आहे.