छत्रपती संभाजीनगर : सुप्रीम स्विचगियर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स प्रायव्हेट लिमिटेड (Supreme Switchgears And Transformers Pvt .Ltd) वाळुज, एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर व सीटू मजदूर युनियन यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन कामगारांसाठी ९००० रुपये मागणी करार यशस्वी करण्यात आला. ए-ग्रेडच्या कामगाराला नऊ हजार रुपये व बी-ग्रेडच्या कामगाराला आठ हजार रुपये पगार वाढ करण्यात आली आहे.
हा करार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ पासून पुढे साडेतीन वर्षांसाठी लागू करण्यात आला आहे.
ए-ग्रेड कंपनीतील कामगारांना पहिल्या वर्षी एकूण ३९०० रुपये, तर दुसऱ्या वर्षी २५५० रुपये व तिसऱ्या वर्षी १२७५ रुपये, चौथ्या वर्षी १२७५ रुपये देण्यात येणार आहे.
बी-ग्रेड मधील कामगारांना पहिल्या वर्षी ३८०० रुपये, दुसऱ्या वर्षी २१०० रुपये, तिसऱ्या वर्षी १०५० रुपये व चौथ्या वर्षी १०५० रुपये पगारवाढ करण्यात आली आहे. एकूण रकमेच्या २५% बेसिकमध्ये वाढ करण्यात आली आहे.
तसेच दिवाळी बोनस ए-ग्रेड मधील कामगारांना पहिल्या वर्षी २५००० हजार रुपये, दुसऱ्या वर्षी २६००० हजार रुपये, तिसऱ्या वर्षी २७००० हजार रुपये, चौथ्या वर्षी २८००० हजार रुपये. बी-ग्रेड मधील कामगारांना दिवाळी बोनस पहिल्या वर्षी १९००० रुपये, दुसऱ्या वर्षी २०००० रुपये, तिसऱ्या वर्षी २१००० रुपये व चौथ्या वर्षी २२००० रुपये मिळणार आहेत.
शासनाच्या नियमानुसार महागाई भत्ता मान्य करण्यात आला आहे.
सर्व कामगारांना ग्रुप इन्शुरन्स दोन लाखांचा देण्यात येणार आहे.
- कॉ. बस्वराज पटणे, सीटू सेंटर छत्रपती संभाजीनगर

