औरंगाबाद : येथील क्युरीया इंडिया प्रा. लिमी.(Curia India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापण व औरंगाबाद मजदूर युनियन सीटू यामध्ये दि २२ जुलै २०२२ रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
करार कालावधी : सदर करार हा ३ वर्षे (दि.१ मे २०२१ पासून ते दि. ३० एप्रिल २०२४) करण्यात आला.
पगारवाढ : पगारवाढ रु.१९,१००/- देण्यात आली. पहिल्या वर्षी ७०%, दुसऱ्या वर्षी १५% व तिसऱ्या वर्षी १५% पगार वाढ देण्यात येणार आहे. ही वाढ इन हॅन्ड असून तीन वर्षासाठी एकूण वाढ रुपये CTC रू.२५,०००/- ही एवढी भरघोस वाढ करण्यात आली आहे.
पुर्ण रक्कमेची ५०% हे बेसिक मधे व ५०% इतर अलाऊंसमधे रक्कम देण्यात येणार आहे.
या करारामुळे कामगारांचा पगार ६० ते ६५ हजारापर्यंत होणार आहे.
महागाई भत्ता : पर पॉइंट २ रुपये प्रमाणे १९६० सिरीज मुंबई इंडेक्स देण्यात येणार आहे ,
बोनस/सानुग्रह अनुदान : प्रत्येकी कामगारांना दिवाळी बोनस/सानुग्रह अनुदान म्हणून रु.३०,०००/- (तीस हजार) रुपये देण्यात येणार आहे ,
कर्ज : कामगारांच्या मुला - मुलींच्या लग्नासाठी बिन व्याजी कर्ज म्हणून रु.१,००,०००/-(एक लाख) रुपये देण्यात येणार आहेत व त्या रकमेची समान हप्त्यात परत फेड करून घेण्यात येणार आहे.
ओव्हर टाइम : यामध्ये कामगारांना कँटीन भत्ता म्हणून १००/- रुपये वाढ करण्यात आली आहे ,
पेड हॉलीडे रोजी ओव्हरटाइम केला तर डि ए बेसिक पगाराच्या पाचपट वाढ देण्यात येणार आहे.
फरक रक्कम : सर्व कामगारांना मागील फरक म्हणून रु.१,०५,०००/- (एक लाख पाच हजार ) रुपये देण्यात येणार आहे
या करारावर कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये कामगार उपायुक्त श्री राउत साहेब, सहाय्यक कामगार उपायुक्त श्री बोरसे तर व्यवस्थापना तर्फे श्री प्रसाद दातार (एच आर हेड), श्री प्रविण कुलकर्णी (एच आर विभाग असिस्टंट), युनियन तर्फे सीटूचे जेष्ठ कामगार नेते, राज्य सचिव, औरंगाबाद मजदूर युनियन अध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण साकु्डकर, युनियनचे सचिव कॉ.दामोदर मानकापे, कॉ.मंगल ठोंबरे, कॉ.अजय भवलकर, तसेच स्थानिक कमिटीचे कॉ.शेख चॉंद, कॉ.अण्णा शिंदे, कॉ.संजय बोरगावे, कॉ.गोपेश कुमार रॉय, कॉ.प्रभाकर गवळी, कॉ.सय्यद ईसाक, कॉ.राजु मिसाळ, कॉ.संतोष धामणे, कॉ.बाबुलाल यादव यांनी कामगार उपायुक्त कार्यालयामधे या करारावर स्वाक्षरी करुन हा करार करण्यात आला आहे. कामगारांनी या कराराचे जल्लोषात स्वागत केले.