महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) या कामगार संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक २० जुलै २०२२ रोजी लोणावळा येथील श्रम साफल्य भवन येथे संपन्न झाली. या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या अध्यक्षस्थानी इंटकचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष श्री. एच. बी. रावराणे तसेच बंडोपंत वाडकर, सुर्याजी इंगळे, राजपूत, बबनराव वडमारे, श्रीकांत सद्दू, राजेंद्र घुगे, रमेश शिंदे, सारीका ताई शिंदे व इतर पदाधिकारी, सभासदांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी इंटकचे राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांची महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते व एकमुखाने ठराव पास करून निवड करण्यात आली. तसेच मुकेश तिगोटे यांची सरचिटणीस पदी फेरनिवड करण्यात आली.