पुणे : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन होऊन १७ वर्षे उलटुन गेली आहेत.खाजगी एजन्सी मार्फत सुरक्षा रक्षकांची पिळवणूक होत असल्याने शासनाने मंडळाची स्थापना करून तेथील आस्थापना व सुरक्षा रक्षकांची नोंदणी करून त्यांना कायदेशीर भारतीय संविधान अनुच्छेद ४३ नुसार सामाजिक सुरक्षा आणि किमान वेतन देणे ही मंडळाची जबाबदारी आहे.
परंतु मंडळाकडून नोंदीत सुरक्षा रक्षकांना योजनेत तरतुद असुन ही पेन्शन योजना, पीएफ शी सलग्न विमा कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना रु.७ लाख योजना अद्याप लागु केलेल्या नाहीत.दि पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट १९७२ नुसार ग्रॅच्युइटी दिली जाते पण त्याचे नियम निश्चित नसल्याने अनेक सुरक्षा रक्षक ग्रॅच्युइटी पासुन वंचित असुन त्यावरील सलग्न विमा अद्याप लागु केलेला नाही.
संघटनेने कामगार मंत्री ,प्रधान सचिव,कामगार आयुक्त,मंडळाचे अध्यक्ष यांचेकडे मागणी करून ही ग्रॅच्युइटी विमा,११ वर्ष सेवा करून ही ग्रॅच्युइटी दिली नाही,मृत सुरक्षा रक्षकांना पीएफ वरील संलग्न विमा रू.७ लाख दिलेला नसुन उपदान विमा सुद्धा दिलेला नाही. सेवा निवृत्तीनंतर सुरक्षा रक्षकांना पेन्शन मिळत नसल्याने त्यांचे जीवन अंधकारमय होत आहे.
महासंघाने या योजना लागु करण्यासाठी मागणी केलेली असुन आगामी काळात यासाठी आंदोलने देखील करणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदुर संघाचे जिल्हा सचिव तुकाराम कुंभार,प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पारधी,संघटनमंत्री अविनाश मुंढे,राजकुमार काळे,कान्होपात्रा ढोल,सयाजी कदम यांनी दिली आहे.
