प्लास्टिक उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना व विशेष भत्ता रक्कम

राज्यातील प्लास्टिक उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना दि.२० जुलै २०१० रोजी व विशेष भत्ता रक्कम दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाली असून या प्लास्टिक उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.

महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना याउपर (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो.

राज्यातील प्लास्टिक उद्योगातील कामगारांना दर महिन्याला किमान वेतन कायदा, १९४८ (The Minimum Wages Act, 1948) नुसार खालील प्रमाणे किमान वेतन मिळणे गरजेचे आहे -

परिमंडळ १ करिता : मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : ५,३००/- + ६,१४८/- = ११,४४८/-
२) अर्ध कुशल कामगार : ४,८००/- + ६,१४८/- = १०,९४८/-
३) अकुशल कामगार : ४,३००/- + ६,१४८/- = १०,४४८/-

परिमंडळ २ करिता : मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : ५,१५०/- + ६,१४८/- = ११,२९८/-
२) अर्ध कुशल कामगार : ४,६५०/- + ६,१४८/- = १०,७९८/-
३) अकुशल कामगार : ४,१५०/- + ६,१४८/- = १०,२९८/-

परिमंडळ ३ करिता : मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : ५,०००/- + ६,१४८/- = ११,१४८/-
२) अर्ध कुशल कामगार : ४,५००/- + ६,१४८/- = १०,६४८/-
३) अकुशल कामगार : ४,०००/- + ६,१४८/- = १०,१४८/-

टीप - वरील किमान वेतन हे दि. ३० जून २०२२ पर्यंत लागू राहील. विशेष भत्ता रक्कम दर सहा महिन्याला बदलली जाते त्यानुसार मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रकम = किमान वेतन रक्कम गणली जाते.

राज्यातील प्लास्टिक उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना दि.२० जुलै २०१० पाहण्यासाठी - क्लिक करा

दि. १ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिद्ध झालेले मूळ किमान वेतन + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन पत्रक - क्लिक करा