पुणे : रांजणगाव MIDC येथील वेस्टरॉक इंडिया प्रा.लिमि.(WestRock India Private Limited) कंपनी व्यवस्थापन व वेस्टरॉक इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दि. ७ जुलै २२ रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
करार कालावधी : सदर करार हा ३ वर्षे (दि.१ ऑक्टोबर २०२२ पासून ते दि. ३० सप्टेंबर २०२४) करण्यात आला.
प्रथम वर्ष - रु.४०००/-
द्वितीय वर्ष - रु.३७५०/-
त्रितीय वर्ष - रु.३७५०/-
ही वाढ इन हॅन्ड असून तीन वर्षासाठी एकूण वाढ रुपये CTC रू.१४५०१/- ही एवढी भरघोस वाढ करण्यात आली आहे
पुढील वेतन करार संपण्यापूर्वी ६ महिने अगोदरच मागणी पत्र देऊन करार चर्चा करून संपुष्टात आणण्याचा मानस आहे
सदर पगार वाढ ही मागील तीन वर्ष कंपनी च्या उत्पादनात वाढ न होता ,करोना (covid 19) चा झालेला परिणाम तसेच वाढलेले कच्या मालाचे दर या अवघड परिस्थितीचा सामना करत असताना, महागाईचा सामना करत असताना कामगारांनी कंपनी साठी पूर्ण ताकदीने कंपनीच्या मागे उभे राहण्याचे ठरले असून कंपनीने देखील कामगारांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी दिलेली भरघोस पगार वाढ हे उदाहरण एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ अशी झाली आहे
सदर करारा वर कंपनी च्या वतीने सीईओ राकेश त्रिपाठी, इंडिया हेड HR चिराग ब्राह्महभट्ट, प्लांट हेड अंकुर पारीख तसेच युनियन च्या वतीने अध्यक्ष ग.द . विश्वासराव, सरपंच उपाध्यक्ष दिपक रत्नपारखी, सचिव सुभाष कौठळे, सल्लागार लक्ष्मण नवले, अजिनाथ लोखंडे, बिभीषण शेलार, कैलास फंड यांच्या स्वाक्षरी झाल्या.
या करारासाठी माजी अध्यक्ष अनिल दूंडे ,कुशल कळमकर,कानडे हनुमंत,संभाजी चौधरी,अरुण यादव, आणि वेस्टरॉक युनियनचे सर्व कामगार बंधू यांनी सहकार्य केले.
तसेच श्रमिक एकता संघ पुणे यांच्या वतीने अध्यक्ष दिलिप पवार, सल्लागार मारुती जगदाळे, रोहित पवार, संतोष कणसे आणि सायास को. सोसा.चे चेअरमन अरविंद श्रोती साहेब यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.