फ्लेमिंगो फार्मा प्रा.लि.(Flamingo Pharma Pvt.Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

नांदेड : दि. २१ जून २०२२ रोजी फ्लेमिंगो फार्मा प्रा.लि. एम आय डी सी कुष्णूर ता.नायगाव जि.नांदेड येथील कंपनीत औरंगाबाद मजदुर युनिन च्या नेत्रत्वाखाली फ्लेमिंगो फार्मा प्रा.लि.(Flamingo Pharma Pvt.Ltd.) कंपनी व्यवस्थापन व औरंगाबाद मजदुर संघटनेत पगारवाढीचा करार उभय पक्षात सहमती होऊन पगार वाढीचा करार संपन्न झाला.

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खालील प्रमाणे -

पगारवाढ : कामगारांना रु.१०,०००/- ची भरघोस पगारवाढ, पहिल्या वर्षी ६० टक्के, दुसरे वर्ष २० टक्के, व तिसरे वर्ष २० आहे.
ग्रास पगाराच्या ६०% पगार हे बेसिक मध्ये व ४०% पगार इतर अलाउन्स मध्ये देण्यात येणार आहे.

कालावधी : सदर करार १ एप्रिल २०२२ पासून तीन वर्षासाठी करण्यात आला आहे

नाईट शिफ्ट अलाऊन्स : कामगारांना नाईट शिफ्ट अलाऊन्स प्रती दिवस रु.१००/- असा देण्यात येणार आहे.

प्रत्येक कामगाराला रु.१०००/- दरमहा अटेडन्स बोनस मिळणार आहे.व रु.१०००/- व्हेरेबल मध्ये देणार ते पुढील दोन वर्षात विभागणी करुन.

फरक : सर्व कामगारांना मागील वर्षातील फरक रु.५०००/-  देण्यात येणार आहे.

वर्षाला एकदा सर्व कामगाराना वार्षिक सहलीस व्यवस्थापन स्वखर्चाने घेवून जाणार आहे.

मेडिकल पॉलिसी : ईएसआयसी च्या बाहेर असणाऱ्या कामगारांना मेडिकल पॉलिसी लागू करण्यात आली आहे.स्वत:, आई वडील व पत्नी दोन अपत्य असे आहे. 

वार्षिक स्नेहसंमेलन : वर्षात एकदा वार्षिक स्नेहसंमेलन ठेवण्यात आले आहे.

इंजिनीअरिंग विभागातील कामगार बंधूना गणवेश देण्यात येणार आहे. 

अ‍ॅडव्हान्स : प्रत्येक महिन्यात पाच कामगार बंधूना पगारी अ‍ॅडव्हान्स रु.२०,०००/- देण्यात येईल. शर्ती अटीनुसार..

महिन्यात  एकदा कामगारांचे वाढदिवस साजरा करणार व भेटवस्तू देणार.

दिपावली बोनस कायद्यानुसार देणार व स्विटबॉक्स देणार. 

एप्रिल व मे.२०२२ या दोन महिन्याचे एरिअर्स मिळणार आहे. 

रजा : पी एल रजा - २ व एस एल रजा - १ वाढ करण्यात आली आहे. 

      या करारावर व्यवस्थापनाच्या तर्फे डॉ.सुनील महाजन (सीईओ), अरुण अगरवाल (प्लांट हेड), अशोक पब्बावार (एचआर) आणि युनियन तर्फे औरंगाबाद मजदुर युनियन चे सचिव कॉ. अजय उध्दव भवलकर, औ.मजदुर वर्किंग कमिटी चे सदस्य म.रा.पा.डि.का.संघ धर्माबाद जनरल सेक्रेटरी कॉ. वाय. बी. पवार, स्थानिक युनियन कमिटी कॉ.दीपक रुईकर(अध्यक्ष), कॉ.सचिन लबडे (उपाध्यक्ष), कॉ.विष्णु कातुरे (सचिव), कॉ.देवानंद शेळगाये (सहसचिव), कॉ.शुभम देवसरकर (कोषध्यक्ष), कॉ. तानाजी सूर्यवंशी (सदस्य), कॉ.पंडित जाधव (सदस्य) उपस्थित होते.