टाटा फिकोसा ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स लि.(Tata Ficosa Automotive Systems Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण :  वराळे (चाकण) येथील औद्योगिक वसाहतीमधील टाटा फिकोसा ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स  लि. (Tata Ficosa Automotive Systems  Limited) कंपनी व्यवस्थापन आणि टाटा फिकोसा एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला .

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

  • कराराचा कालावधी : ४ वर्ष (दि.१ ऑक्टोबर २०२१ पासून लागू)

  • मूळ पगार वाढ :   रु. १०,८२५/- 
           प्रथम वर्ष - ५५%
           द्वितीय वर्ष - १५%
           तृतीय वर्ष - १५%
          चतुर्थ वर्ष - १५%

  • कामगारांना बदलता महागाई भत्ता (VDA) लागू करण्यात आला.

  • मृत्यू सहाय्य निधी देण्याचे मान्य, या अंतर्गत कामगारांचा १ दिवसाचा पगार + त्या रकमेच्या१.५ पट रक्कम कंपनी देणार.

  • कामगार पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य मदत.

  • कामगारांसाठी १०,१५,२०,२५ वर्ष झाल्यास सर्व्हिस अ‍ॅवार्ड देण्यात येणार.

  • सद्यस्थितीत असलेल्या कामगारांच्या कौटुंबिक विम्यात वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले.

    सदर कराराच्या वेळी कंपनी तर्फे सुरेश नारायणन (CEO), आशुतोष शर्मा (GM HR) व अतुल जोशी, रोहन मोरे, TACO ग्रुप ऑफिसच्या वतीने गिरीश बहदुरिया, प्रॉडक्शन हेड संदीप देवट व दिपक येवले, क्वालिटी हेड प्रभीर नंदि तसेच टाटा फिकोसा एम्प्लॉईज युनियनतर्फे अध्यक्ष देविदास थिटे, सेक्रेटरी राजेंद्र गणोरकर, सचिन कापसे, रमेश ओझरकर, सोमनाथ काटे, दिपक नारखेडे, सचिन दूपारे उपस्थित होते.