सफाई कामगारांना आवश्यक सोयीसुविधा पुरवा - डॉ.पी.पी.वावा

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पुणे - सफाई कामगारांना (Cleaning Worker) आवश्यक सर्व सोयीसुविधा, (Convenience) सुरक्षा साधने आणि कामकाजासाठी सयंत्रांचा पुरवठा पुरविण्याची कार्यवाही (Crime) करावी. तसेच, सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा (Dr P. P. Vava) यांनी दिले असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

    विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

    डॉ. वावा म्हणाले, 'पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी पक्के घरे उपलब्ध करण्यासाठी चांगले काम करीत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा. सफाई कामगारांना विमा संरक्षण आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी. कामगारांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाहीत, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.'