कंत्राटी कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन

मुंबई: नवी मुंबई  महापालिकेच्या 7 हजार कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. कोरोना (Corona) काळात मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत मिळावी तसेच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे असे वृत्त साम TV वृत्तसंस्थेने दिले आहे.

    नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर विविध विभागात काम करणारे 7000 कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. यात 4 हजारापेक्षा अधिक सफाई कर्मचारी आहेत. कोरोनामुळे (Corona) मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत देणे, कोविड काळात काम केल्याबद्दल कोविड (Covid) भत्ता देणे व कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करणे या तीन प्रमुख मागण्या आहेत.

    या आंदोलनाबाबत योग्य तोडगा न काढल्यास हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर आडमुठे पणाचे धोरण अवलंबत असल्याची टीका कामगार नेत्यांनी व्यक्त केली आहे.