बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी ५१००० हजार रुपये मागणी मान्य झाल्याबद्दल तसेच तीन नवीन योजनाची घोषणा त्यांनी केली त्याकरिता महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या वतीने कामगार मंत्री यांना "आभार पत्र" देण्यात आले.
यावेळी सर्व नोंदीत घरेलु कामगारांना कोरोना बंद कालावधी करता मिळणारी १५०० रुपयांची मदत ६० वर्ष पूर्ण झालेल्या घरेलु कामगारांना सुध्दा मिळावी आणि ३००० रुपये पेन्शन मिळावी या करिता निवेदन देण्यात आले. तसेच येरवडा पुणे येथे स्लॅब कोसळून ज्या बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला व जखमी झालेल्या कामगारांच्या वारसांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळा मध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शरद पंडित, सहसचिव राजकुमार सुतार, प्रदेश उपाध्यक्ष मिना पंडित, प्रदेश सचिव सुवर्णा कोंढाळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष उषा जाधव आणि कर्तव्य फाऊंडेशनचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.