दादर : येथील छबिलदास विद्यालय सभागृहात दिनांक १२ फेब्रुवारी रोजी आयोजित मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे आयोजित शिक्षक मेळाव्यात बोलताना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी केले.
कोरोनाची ढाल पुढे करून राज्य सरकारने शासकीय कर्मचारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.
सन २००५ पासून सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू केली असून त्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. या योजनेतील कर्मचाऱ्यांना ग्रज्युटी आणि फॅमिली पेन्शन नाकारली आहे. प्रदिर्घ सेवा बजावून सेवानिवृत्ती नंतर तुटपुंजी रक्कम त्यांना मिळणार असून त्यातील उर्वरित रक्कम सरकार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा जुगार खेळत आहे. याकरिता सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी हा दोन दिवसीय राज्यव्यापी जाहीर केला आहे.
राज्यातील दोन लक्ष सरकारी पदे रिक्त आहेत.त्याचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे. शासनाने तातडीने सर्व रिक्त पदे तातडीने भरली पाहिजेत. राज्यातील दिड लक्ष कंत्राटी कामगारांना कायम केले पाहिजे आणि अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने सेवेत रुजू करून घेतले पाहिजे.
राज्य शासनाने बक्षी समितीचा खंड दोन अद्याप प्रकाशित केला नसल्याने वेतनत्रुटींचे निवारण झालेले नाही. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक अनेक महत्त्वाच्या मागण्या बराच काळ प्रलंबित आहेत.
वारंवार निवेदने देऊन सुद्धा सरकार मध्यवर्ती संघटनेला चर्चेला बोलवत नाही. या कारणांमुळे राज्यातील १७ लक्ष सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दिनांक २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी संपावर जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिक्षकांना प्राध्यापक संघटनेने किशोर टेकेदत्त , शिक्षक संघटनेचे सतिश इनामदार, नानासाहेब पुरंदरे, ज्योती नेटवटे यांनी यथोचित मार्गदर्शन केले.