EPF वर जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता !

मुंबई : एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ईपीएफओ (EPFO) 2021-22 या वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींबाबत (Provident Fund Deposits) एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

    ईपीएफओ पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत पीएफ व्याजदराबाबत (Interest Rate) निर्णय घेणार आहे. ' ईपीएफओची बैठक मार्चमध्ये आसाममधील गुवाहाटी (Guwahati) येथे होणार आहे. मार्चमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षाचा शेवट होत असल्यानं त्यावेळी पीएफ व्याजदराचा प्रस्ताव मांडला जाईल, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री (Union Labour Minister) भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी पीटीआयला दिली. केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) ही केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेणारी संस्था आहे.

    कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) पुढील महिन्यात मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीत 2021-22 साठी PF ठेवींवरील व्याजदरांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.बैठकीत 2021-22 साठी पीएफ ठेवींवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकते.