आपल्या विविध २८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी तृतीय, चतुर्थ श्रेणी अशा १७ लाख कर्मचार्यांनी संपाची हाक दिलीय. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्ष करणे आणि इतर मागण्यांसाठी येत्या २३ तसेच २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवस संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.
नवीन निवृत्तीवेतन योजना रद्द करून सर्व लाभ तात्काळ देणे, सर्व कर्मचाऱ्यांना किमान समान वेतन देणे, कंत्राटी कामगार, योजना कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स यांच्या सेवा नियमित करणे. सरकारच्या कोणत्याही विभागात खासगीकरण करू नये, रिक्त पदे तत्काळ भरावीत, नवीन शिक्षण धोरण रद्द करावे, महिला कर्मचाऱ्यांना संगोपन रजा मंजूर करावी, मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा प्रश्न सोडवावा आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.
राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या २३ ते २४ फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे.