राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते स्वर्गीय र. ग. कर्णिक यांचे जयंती निमित वृक्षारोपण

मुंबई : शासनाने आपल्याला नेमून दिलेले काम मनापासून करून सर्वसामान्य जनतेला मदत करण्याची भूमिका सरकारी कर्मच्याऱ्याची असावी असे कर्णिकसाहेब नेहमी सांगत. त्याप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्याचे आचरण असावे अशी साहेबांची आग्रही भूमिका असे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी या प्रमाणे वागणे ही साहेबांना खरी आदरांजली ठरेल. असे प्रतिपादन, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस,  अविनाश दौंड, यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते स्वर्गीय र. ग. कर्णिक यांचे जयंती निमित  पुराभिलेख संचालनालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात  केले. 

    संचालनालयाचे संचालक श्री. सुजितकुमार उगले यांचे हस्ते साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वत: कर्णिक यांनी लिहिलेली शपथ दौंड यांनी संचालनालयातील सर्व कर्मचाऱ्यांना दिली. 

    मध्यवर्ती संघटनेने सुचविल्या नुसार या निमित्ताने पुराभिलेख संचालनालयात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी पुराभिलेख संघटनेचे सल्लागार सगुण सावंत, संचालनालयाच्या सहाय्यक संचालक श्रीमती भावना भालेराव, सहाय्यक अधिक्षक स्नेहल सर्वेकर, मुख्य छायाचित्रकार गिरीष गावंड, एलफिन्स्टन महाविद्यालयाचे सुनील तुस्कानो, विक्रीकर विभागाचे प्रकाश पाटील हजर होते. 

कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष संतोष धनावडे यांनी तर आभार सरचिटणीस संजय बेलोसे यांनी मानले. पुराभिलेख संघटनेचे खजिनदार संतोष चव्हाण, संघटक सदाशिव ठाकूर, उपाध्यक्ष अनिल मोरे, शिवाजी गोसावी, संजय तावडे, अशोक धोंड, अमोल ननावरे, विजय पाटील, भूपत सोलंकी, महेंद्र तांबडकर यांनी कार्यक्रमाची यशस्वी आखणी आणि देखणे नियोजन केले होते.