Sogefi Adm Suspensions Pvt Ltd येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : येथील औद्योगिक वसाहतीमधील Sogefi Adm Suspensions Pvt Ltd कंपनी व्यवस्थापन आणि  शिवगर्जना कामगार संघटना यांच्यामध्ये खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात वेतनवाढ करार संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

  • एकूण पगार वाढ :   रु. १०,९००/-

  • कराराचा कालावधी :   ३ वर्षे (दि.०१/०४/२०२१ ते दि.३१/०३/२०२४ पर्यंत)

  • पगार वाढीचे प्रमाण    :   ५० : २५ : २५ तीन वर्षासाठी

  • करार फरक रक्कम रु. ४९,५००/- देण्यात येणार

  • वैद्यकीय विमा रु. 2 लाख रु. 5 लाख बफर रकमेसह

  • रु. 5 लाखांचा अपघात विमा.

  • वार्षिक एकूण रजा २९ करण्यात आल्या

  • उत्पादन प्रोत्साहन म्हणून रु. १,०००/- देण्यात येणार

  • अटेन्डन्स बोनस म्हणून दर महिना रु. ८००/- (२६ दिवस प्रत्यक्ष हजर दिवसांकरिता)

      या करारावर व्यवस्थापनाकडून श्रीम. विभा अनुप (Group HR of SogifiADM), संदीप पाटील (HR Head), कृष्णा नरळे (HR Manager), राजेश गुप्ता (Executive Director), महेश गोळे (Chif Finance) कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष संतोष (अण्णा) बेंद्रे, शिवनंदन सिंग, अनिल भोसले, शैलेश वानखेडे, अमर चौगुले, नामदेव खोंडे, संतोष सोनवणे, पंकज सोनवणे, रवी सिंग, अरविंद सिंग, उमेश वानखेडे, मल्हारी चव्हाण, तुषार पाटील, सोहन भारती, बसंत भारती, राहुल मुळीक, अन्वर अन्शारी उपस्थित होते.