आता पुणे जिल्हासाठी, पिंपरीत बनणार नवे स्वतंत्र भविष्य निर्वाह निधी भवन

भाजपा कामगार आघाडीच्या मागणीला यश

पुणे : भोसरी पिंपरी रोडवरील नेहरुनगर येथील हिंदुस्थान ॲन्टीबायोटिक लिमिटेड कंपनीच्या जागेत पुणे, पिंपरी-चिंचवड हे दोन्ही क्षेत्रीय व  झोनल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) कार्यालय उभारण्यात येणार आहे . नुकतेच साडेतीन एकर जागेचा ४२ कोटीचा व्यवहार व नोंदणी पूर्ण झाली आहे. 

    त्यामुळे आता झोनल कार्यालय ( गोळीबार मैदान ), क्षेत्रीय कार्यालय पुणे -१ ( गोळीबार मैदान ) व क्षेत्रीय कार्यालय पुणे २ ( आकुर्डी ) या सर्वांचे कामकाज एकाच ठिकाणावरून चालणार असून , नागरिकांना याचा फायदा होणार आहे . कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना क्षेत्रीय कार्यालय पुणे २ यांच्यावतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक सादर करुन, याबाबत माहिती देण्यात आली. 

२०२० ला तात्कालिन केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्याकडे पुणे,  पिंपरी-चिंचवड, चाकण साठी मध्यवर्ती पीएफ कार्यालय असावे, अशी मागणी केली होती. 

   तिन्ही कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने लाखो कामगार  / सभासदांना फायदा होणार आहे. याप्रक्रियेमध्ये आकुर्डी कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त रवींद्र कुमार, आशुतोष , मितेश राजमाने , सचिन बोराटे , अशोक गैंगजे , दिनेश शेलार, आलोक कुमार, पंकज नेमा , हेमराज मेहरा, संदीप अखोरी प्रसाद , एम के मिश्रा व बिपीन कुमार यांनी योगदान दिले. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, प्रदेश सरचिटणीस केशव घोळवे, हनुमंत लांडगे यांनी एक संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे आभार व्यक्त केले आहे.