एअर इंडियाच्या कर्मचार्यांच्या सामाजिक सुरक्षा संबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना सामाजिक सुरक्षा विषयक लाभ पुरवण्यासाठी ईपीएफओने एअर इंडियाबरोबर करार केला आहे. एअर इंडियाने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि अन्य तरतुदी कायदा 1952 च्या कलम 1(4) अंतर्गत कर्मचाऱ्यांना लाभ मिळावेत यासाठी अर्ज केला होता, त्याला 13.01.2022 च्या राजपत्र अधिसूचनेद्वारे 1-12-2021 पासून परवानगी देण्यात आली आहे.
सुमारे 7,453 कर्मचार्यांना सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान केले जातील , ज्यांच्यासाठी एअर इंडियाने डिसेंबर 2021 या महिन्यासाठी ईपीएफओमध्ये योगदान भरले आहे. एअर इंडियाचे हे कर्मचारी आता खालील लाभांसाठी पात्र असतील:
कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात त्यांच्या वेतनाच्या 12 % दराने नियोक्त्याचे अतिरिक्त 2% योगदान मिळेल. यापूर्वी त्यांना 1925 च्या भविष्यनिर्वाह निधी कायद्यांतर्गत लाभ मिळत होते , ज्यात भविष्य निर्वाह निधीमध्ये नियोक्त्याचे योगदान 10% आणि कर्मचाऱ्यांचे 10% योगदान होते.
ईपीएफ योजना 1952, ईपीएस 1995 आणि ईडीएलआय 1976 आता कर्मचाऱ्यांना लागू होतील.
कर्मचार्यांना किमान 1,000/- रुपये निवृत्तिवेतनाची हमी मिळेल आणि कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास कुटुंब आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांना निवृत्तीवेतन मिळेल.
सदस्याचा मृत्यू झाल्यास किमान 2.50 लाख रुपये आणि कमाल 7 लाख रुपये निश्चित विमा लाभ मिळेल. या लाभांसाठी कर्मचार्यांना कोणताही प्रीमियम आकारला जात नाही.
1952-53 पासून, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या दोन स्वतंत्र कंपन्या होत्या आणि पीएफ कायदा 1925 अंतर्गत समाविष्ट होत्या. 2007 मध्ये, दोन्ही कंपन्या एका कंपनीत एअर इंडिया लि . मध्ये विलीन झाल्या. पीएफ कायदा 1925 अंतर्गत, भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळत होता.मात्र कोणतीही वैधानिक पेन्शन योजना किंवा विमा योजना नव्हती. कर्मचारी स्वतः पैसे भरून ऍन्युइटी -आधारित पेन्शन योजनेत सहभागी होत असत. योजनेच्या मापदंडांच्या आधारे, जमा रक्कम कर्मचार्यांना दिली जायची . किमान निवृत्तिवेतनाची हमी नव्हती आणि सदस्याचा मृत्यू झाल्यास अतिरिक्त लाभ मिळत नव्हता.