निल मेटल प्रॉडक्ट लिमिटेड (Neel Metal Products Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : म्हाळुंगे औद्योगिक नगरीतील निल मेटल प्रॉडक्ट लिमिटेड (Neel Metal Products Limited) आणि हिंद कामगार संघटनेच्या वतीने तिसरा वेतन वाढीचा करार कामगार नेते तसेच पिंपरी-चिंचवड काँग्रेस शहर अध्यक्ष डॉ.कैलासभाऊ कदम यांच्या उपस्थितीत शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात गुरुवार दि. 2 डिसेंबर 2021 रोजी संपन्न झाला.

वेतन व इतर वाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

  • सदर करार दि.1 ऑगस्ट 2021 ते 31 जुलै 2024 या कालावधीसाठी लागू असेल.
  • 3 वर्षासाठी 13,500 /- रुपये सदर रक्कम तीन टप्यामध्ये देण्याचे मान्य केले आहे.
          पहिल्या वर्षी : रु.6900/-
          दुसऱ्या वर्षी : रु.3200/-
          तिसऱ्या वर्षी : रु.3400/-

  • दिवाळी बोनस : 3 वर्षासाठी दिवाळी बोनस म्हणून रु.22,800/- प्रतिवर्ष देण्याचे मान्य केले आहे.

  • मेडिक्लेम पॉलिसी : 2 लाख रुपये  (स्वतःकामगार ,पत्नी ,2मुले व आई वडील) तसेच मृत्युसमयी अपघाती 11 लाख नैसर्गिक 10 लाख देण्याचे मान्य केले.

  • मृत्यू सहाय्य निधी : सर्व कंपनीतील  कामगारांचा एक दिवसाचा पगार व दुप्पट रक्कम कंपनी त्यामध्ये टाकून मृत्यू सहाय्य निधी म्हणून संबंधित कामगाराच्या वारसास देण्यात येईल. तसेच मृत्यूसमयी तातडीची मदत म्हणून रु.15,000/- बिना परतावा कामगारांच्या वारसास देण्यात येईल 

  • शैक्षणिक बक्षीस योजना : कामगारांच्या पाल्यांना विशेष टक्केवारी प्रमाणे रु.2000 ते रु.3500 पर्यंत देण्यात येईल

  • रजा : 38 (EL:-19 , SL:-10 ,CL:- 9) रजा देण्याचे मान्य केले आहे.

  • एरीअर्स : रु.50,000/- ऑगस्ट पासुन वाढीव पगारा नुसार चार महीन्याचा अतिरिक्त फरक देण्यात येईल.

  • मागील करारातील सर्व सेवा शर्थी व अटी आहे तशाच पुढे चालु राहतील असे उभय पक्ष्यानी मान्य केले आहे.

      सदर करार यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या  वतीने अध्यक्ष डॉ.कैलासभाऊ कदम, जनरल सेक्रेटरी यशवंत सुपेकर, उपाध्यक्ष शांताराम कदम, खजिनदार सचिन कदम, कामगार प्रतिनिधी संतोष पवार, नवनाथ नाईकनवरे, राजेश पातोंड, दिपक खरात, अमोल पाटील तसेच कंपनीच्या वतीने मिलिंद जठार (प्लांट हेड), संजय भसे( एच आर), संदीप कांबळे (ऑपरेशन हेड), सचिन कानडे (प्रोडक्शन हेड), नागराज शेट्टी ( जनरल मॅनेजर-फायनान्स आणि अकाऊंट), काळूराम रेटवडे (एच.आर. असिस्टंट) सदर करारासाठी माजी नगरसेवक सद्गुरु कदम उर्फ नाना यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले.

कामगार नामा Youtube चॅनल पाहण्यासाठी : क्लिक करा

कामगार विषयक बातम्या पाहण्यासाठी : क्लिक करा