पिंपरी चिंचवड : येथील ट्रिनिटी इंजिनियर्स प्रा. लि.चिंचवड,पुणे (Trinity Engineers Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा सन 2019 - 20 व सन 2020 - 21 या दोन वर्षांचा बोनस न दिल्याने शिवगर्जना कामगार संघटनेच्या संपूर्ण 300 सभासद कामगारांनी कामबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
शिवगर्जना संघटनेचे अध्यक्ष संतोष आण्णा बेंद्रे यांनी दिलेल्या माहिती नुसार कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा सन 2019 - 20 व सन 2020 - 21 या दोन वर्षांचा बोनस दिलेला नाही, कंपनीची दर महिन्याला कोट्यवधी रुयांची उलाढाल होत असताना कामगारांचे बोनस न दिल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष असून त्यामुळे सर्व कामगार व संघटनेने सदर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून व्यवस्थापनाने त्वरित याबाबत निर्णय घेऊन कामगारांना न्याय द्यावा.
या आंदोलनावेळी शिवगर्जना संघटनेचे अध्यक्ष संतोषअण्णा बेंद्रे, संघटनेचे पदाधिकारी, युनिट प्रतिनिधी शिवकुमार जावळे, विनोद वैद्य, विलास बोरले, शिवाजी शेळके, संदीप कचाळे, महेंद्र कुमार साळुंके व सर्व कामगार उपस्थित होते.