रांजणगाव : येथील ASK Chemicals India Pvt Ltd कंपनी व्यवस्थापन आणि एस आय ग्रुप एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- कराराचा कालावधी दि.1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2023 या 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.
- पगारवाढ : प्रत्यक्षात रु.16,000/-, अप्रत्यक्ष रु.5,000/- झाला असुन.
द्वितीय वर्षासाठी : रु.3,200/-
तृतीय वर्षासाठी : रु.1600/- याप्रमाणे करण्यात आली आहे.
- फरकाची रक्कम हि दि.1 जानेवारी 2021 पासुन ग्राह्य धरण्यात आली.
- 45% रक्कम हि मुळ पगारात (Basic) वाढविण्यात आली.
- मेडिक्लेम पॉलिसीमध्ये वाढ करून रु.5 लाख पर्यंत करण्यात आली. मेडिक्लेम पाॅलीसीमधील वाढ ही प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष (CTC) रक्कमेच्या बाहेर आहे.
- इतर सुविधा : 1 पेड हॉलिडे, रेनकोट, बस सुविधा नसणाऱ्यांना पेट्रोल अलाऊंस, नगर वरून येणार यास रु.3600/- पास सेवा रोख
- सदर करार हा कुठल्याही प्रकारे कामाशी (production) निगडित नाही.
करारावेळी व्यवस्थापनात राजेंद्र काळभोर (GM), राजेश वर्मा (H.R.Head) व संघटनेच्या वतीने अध्यक्ष भरत घावटे, उपाध्यक्ष नवनाथ बनकर, जनरल सेक्रेटरी हरिष गाडे, सह सेक्रेटरी दादा पर्हाड, खजिनदार राजकुमार पाटील , सदस्य विकास रासकर, रवि गुंजाळ उपस्थित होते. करार यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, उपाध्यक्ष राजुआण्णा दरेकर यांनी केले.
इतर कामगार विषयक बातम्या पाहण्यासाठी : क्लिक करा
कामगार नामा Youtube चॅनल पाहण्यासाठी : क्लिक करा