पुणे : "जयनाथ" तरुण मित्र मंडळ व पै.किशोर (बाळाभाऊ) धनकवडे नगरसेवक पुणे म.न.पा.अध्यक्ष जयनाथ तरुण मित्र मंडळ आयोजित "ओवाळीते भाऊराया" या महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या घरेलु महिला कामगारांच्या हस्ते कुस्ती क्षेत्रातील मान्यवर वस्ताद मंडळींच्या समवेत भाऊबीजेचा अनोखा कार्यक्रम दि.८ नोव्हेंबर रोजी पूर्ती हॉल येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या प्रदेश,जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते संघटनेच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी प्रास्ताविक केले, मा.नगरसेवक पै.किशोर ( बाळाभाऊ) धनकवडे यांनी "ओवाळीते भाऊराया" या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. आमदार सुनील (आण्णा) शेळके यांनी असा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्या बद्दल आयोजकांचे कौतुक केले,कुस्ती क्षेत्रातील मान्यवर वस्ताद काकासाहेब पवार यांनी मार्गदर्शन केले, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास नगरसेवक सचिन दोडके, नगरसेवक विशाल तांबे, नगरसेविका अश्विनी भागवत, कुस्ती क्षेत्रातील मान्यवर वस्ताद व्यासपीठावर उपस्थित होते. प्रभाग अध्यक्ष सोनाली परदेशी, मिना पंडित, उषा जाधव, शीला आटपाळकर, सुनीता बढे, गीता भिलारे, मिनाझं शेख, वर्षा ताडे इत्यादी संघटना पदाधिकारी उपस्थित होत्या तसेच मोठ्या प्रमाणात घरेलु महिलां कामगारांची उपस्थिती होती.