PF वर 8.5 टक्के दराने मिळणार व्याज, केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी भविष्य निधी संघटनेची (EPFO) खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई - 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांना 8.5 टक्के व्याज दिले जाईल. याचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सहा कोटींहून अधिक खातेदारांना होणार आहे.

    अर्थमंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून हे व्याज लवकरच सभासदांच्या खात्यात जमा करण्यत येणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात अनेक ग्राहकांना व्याज मिळविण्यासाठी 8 ते 10 महिन्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. कामगार सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की लवकरच हा आदेश अधिसूचित करण्यात येणार आहे.

    तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही एक निश्चित रक्कम असते, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते त्याला पीएफ म्हटलं जातं.