घरेलु कामगार महिलांचा "सामुहिक दिवाळी फराळ" कार्यक्रम संपन्न

पुणे : महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या घरेलु कामगार महिलांचा "सामुहिक दिवाळी फराळ" कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना पुणे जिल्हा व श्री.समर्थ मंडळ पुणे.यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     या कार्यक्रमासाठी पुणे मनपा नगरसेवक किशोर(बाळाभाऊ) धनकवडे, श्री समर्थ मंडळ अध्यक्ष भगवानराव देशपांडे, कसबा युवामोर्चा अध्यक्ष अमितकंक,  साफल्य फाऊंडेशन अध्यक्ष गुरुनाथ पटवर्धन, आदर्श पुणे सेवा संघ प्रदीप इथापे हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी सामुहिक फराळ या संकल्पनेचे कौतुक आपल्या भाषणात केले.  

     या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष मिना पंडित, प्रदेश चिटणीस सुवर्णा कोंढाळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष उषा जाधव, सुनीता बढे, वर्षा ताडे, मीनाक्षी बागुल, संध्या अदावडे, स्वाती डिसुझा महाडेश्वर, उषा मोहिते, सुजाता गुंजाळ, सुलोचना पवार, रेश्मा आडसुळ इत्यादी  पदाधिकारी उपस्थित होत्या.तसेच बहुसंख्या घरेलु महिला कामगारांची उपस्थिती होती.

     कार्याक्रमाची सुरुवात भगवान.विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निराली जाधव यांनी केले, प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी केले, आभार प्रदर्शन प्रदेश चिटणीस सुवर्णा कोंढाळकर यांनी केले.