बुलढाणा : बांधकाम कामगारांसाठी लढणारे कामगार नेते व बारा बलुतेदार कामगार संघटनेचे अध्यक्ष सतीश शिंदे यांची राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी नुकतीच शिंदे यांची या पदावर नियुक्ती केली.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना संघटीत करून त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणारी महाराष्ट्रातील एक मोठी कामगार संघटना म्हणून राष्ट्रीय श्रमिक आघाडीची ओळख आहे. संघटनेचे राज्यभर काम असून 57 हजार सभासद आहेत. MIDC , हॉस्पिटल, मेडिकल, शासकीय, कर्मचारी, विज वितरण कंपनी, दूध डेअरी अश्या विविध उद्योग व्यवसायातील कामगारांच्या अनेक समस्या राष्ट्रीय श्रमिक आगाडीने आजवर सोडवल्या असून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले हे विविध खाजगी, सरकारी निमसरकारी, आश्या 178 कंपन्यांमध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहतात. याशिवाय केंद्रीय श्रम मंत्रालय, भारत सरकार यांच्या कामगार कायदे पुनर्गठन समिती मध्ये सदस्य म्हणून देखील त्यांना जबाबदारी मिळाली आहे.
कामगार नेते सतीश शिंदे यांनी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला असून कामगारांच्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली असून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कामगारांचे मजबूत संघटन निर्माण केले आहे. याशिवाय बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाच्या कार्यात देखील शिंदे यांचा हिरीरीने सहभाग असतो. त्यांचे मागील बारा वर्षांपासून सुरू असलेले कार्य पाहून राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी सतीश शिंदे यांच्या खांद्यावर राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली. भोसले यांनी आपल्यावर सोपवलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले असून या जबाबदारीला आपण योग्य प्रकारे न्याय देऊन कामगारांचे प्रश्न सोडवू आणि जिल्ह्यात संघटना मजबूत करु अशी प्रतिक्रिया सतीश शिंदे यांनी आपल्या नियुक्ती संदर्भात व्यक्त केली आहे.