ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडिया प्रा.लिमीटेड (Hyundai Construction Equipment India Pvt. Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण,पुणे : येथील ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडिया प्रा.लिमीटेड (Hyundai Construction Equipment India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि ह्युंडाई इम्प्लोयीज युनियन यांनी गुरुवार दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी गुरुपुष्यामृत योग औचित्य साधून अत्यंत आनंददायी आणि उत्साही वातावरणात वेतन करार स्वाक्षांकित केला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

  • करार कालावधी :  तीन +अतिरिक्त एक असे एकूण चार वर्ष  - दिनांक 01.07.2020 ते दिनांक 30.06.2024
  • वेतनवाढ : तीन वर्ष कालावधी रु. 16,000 /-(Gross) +  मासिक उत्पादन प्रोत्साहन रु. 1,000/- + वार्षिक उत्पादन प्रोत्साहन रु. 500/- = एकूण रु. 17,500/- (Gross) .  तीन वर्ष वेतन विभाजन प्रमाण (70 : 20 : 10)
          अतिरिक्त चौथे वर्ष करार वाढ :  रु. 7,000/- (Gross).

  • मेडिक्लेम :  1.5 लाखावरून रु. 2.5 लाख आणि एकुन 20 लाख Copororate Buffer Policy.

  • नाईट शिफ्ट अलाउस : रु. 20/- वाढ, प्रती नाईट शिफ्ट हजेरी एकूण रु.50/- .

  • पेड हॉलिडे : अतिरिक्त 01 पेड हॉलिडे (ज्या वर्षी लोकसभा, विधानसभा मतदान दिन  त्या वर्षी चा एक दिवस धरून) – एकूण 11 पेड हॉलिडे .

  • उत्पादकता वाढ : 15 % उत्पादकता वाढ .

  • VDA बंद आणि One time मोबदला :  दिनांक 01.11.2021 पासून VDA  संपुर्णपणे बंद करून सध्याची असलेली रक्कम 9210 रु. पगारात फिक्स करण्यात आली असून त्या व्यतिरिक्त रु. 2,500/- पुढील प्रथम वर्षी , त्याचे पुढील दुसरे वर्षी रु. 2,500/- आणि त्याचे पुढील तिसरे वर्षी रु. 2,000/- 

  • फरक रक्कम : एकूण  १६ महिने फरक रक्कम पुढील दोन महिन्यात दोन टप्प्यांत निम्मी निम्मी दिली जाणार आणि युनियनने तीन महिने फरक रक्कम  कोरोना काळ असल्यामुळे न घेण्याचे सहकार्य केले. 

  • Canteen, Transport रक्कम कपात योगदान : प्रती कामगार  एकूण मिळून रु. 250/- Canteen सुविधा मासिक कपात आणि एकूण रु.300/- Transport सुविधा मासिक कपात .

  • NPD / Block Closure : एका वर्षात एकूण 15 दिवस NPD चे दिवस आणि 75% : 25%    (कंपनी रजा: कामगार रजा)  

     व्यवस्थापन आणि युनियन यांनी win-win situation मध्ये दीपावली प्रकाशोत्सव पर्व सुरु होत असताना कामगार आणि कंपनीचे हित साधणारा करार स्वाक्षांकित करून उत्साहाचे वातावरण कंपनीत आणि कामगार परीवारांत निर्माण केले आहे.

    सदर करारासाठी व्यवस्थापनातर्फे जे. एस. पार्क (MD), एस. एच. ली.(Factory Manager), डी. वाय. किम (Director), एन.सी.चोई (GM-HR), मनीष फणसळकर (Head-HR), प्रकाश धोंडगे (Sr. Manager ER) यांनी तर कामगार प्रतिनिधीतर्फे युनियन अध्यक्ष सायबन्ना गोविंदे, जनरल सेक्रेटरी  रोहित पवार आणि जॉईंट सेक्रेटरी विजय गायकवाड, उपाध्यक्ष राम केमसे, जॉईंट सेक्रेटरी गणेश मिसाळ, उपाध्यक्ष सुरज कुंभार आणि खजिनदार अश्विन गोरे यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

    हा करार यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन सल्लागार श्री.रामचंद्र. एम. निर्मल आणि श्रमिक एकता चे प्रमुख सल्लागार तसेच युनियन सल्लागार श्री. मारुती जगदाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. याच बरोबर ऑप्शन पॉझिटिव्ह संचालक अरविंद श्रौती सर तसेच श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव पवार, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील, कार्याध्यक्ष संतोष कणसे, किरण पाटील, दत्तू झेंडे व इतर महासंघातील संलग्न युनियनचे प्रतिनिधी या सर्वांनी सहकार्य केले.