मुंबई : महाराष्ट्रातील बारा लाख नोंदीत बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे दि.28 ऑक्टोबर 2021 पासून महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समिती द्वारे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले
विविध मागण्या पुढील प्रमाणे :
- मुलीच्या लग्नासाठी दोन वर्षांपूर्वी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने केलेल्या ठरावानुसार नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहास 51 हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या.
- दि.3 मार्च 2021 रोजी बांधकाम कल्याणकारी मंडळ ने केलेल्या ठरावानुसार मृत्यू पावलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या वारसांना दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य द्या.
- मागील वर्षी covid-19 व लॉक डाऊन मध्ये कल्याणकारी मंडळामार्फत प्रत्येकी पाच हजार रुपये दहा लाख कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावर्षी मात्र फक्त पंधराशे रुपये दिलेले आहेत. म्हणूनच दिवाळीपूर्वी उर्वरित साडेतीन हजार रुपये रक्कम द्यावी.
- सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी 12 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत .म्हणूनच बारा लाख नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी दहा हजार रुपये बोनस द्या.
- पूरग्रस्त बांधकाम कामगार कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य करा.
या वरील विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी, ठाणे जिल्हा बांधकाम कामगार नेते व किसान सभेचे नेते कॉम्रेड रमेश जाधव, पालघर जिल्हा बांधकाम कामगारांचे नेते कॉ.सुनिल पाटील, सातारा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे नेते कॉ.धनराज कांबळे, औरंगाबाद येथील बांधकाम कामगारांचे नेते दिपक थोरात व परभणी जिल्हा बांधकाम कामगारांचे नेते उस्मान शेख यांनी उपोषणामध्ये सुरु केले.
महाराष्ट्र शासनाकडून पहिल्या दिवशी या उपोषणाची दखल घेतली नाही म्हणूनच बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतलेला आहे असे पत्रक कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले.