कामगारांच्या पगारवाढी करिता मनसे कामगार सेना आली धावून
खामगाव : शहरातील घनकचरा संकलन व्यवस्थापनाचा कंत्राट खामगाव नगरपरिषदे कडून डी एम एंटरप्राइजेस या कंपनीने घेतले आहे. सदर कंत्राटदाराने कामगार कामावर ठेवून घंटागाडी द्वारे शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन कचरा गोळा करून तो कचरा डंपिंग ग्राउंडवर टाकण्याचे काम देण्यात आले आहे.
परंतु डि एम एंटरप्राइजेस कंत्राटदार कंपनीकडून कामगारांना अत्यंत कमी पगार देऊन त्यांचे आर्थिक शोषण करत होती त्या संदर्भात मनसे घंटागाडी कामगार संघटनेकडून वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन व संबंधित कंत्राटदार यांना कामगारांच्या पगार वाढीसाठी करीता अनेक वेळा निवेदन तसेच पत्र व्यवहार करून कामगारांचे पगार वाढ करण्याची विनंती करण्यात येत होती. परंतु नगरपालिका व संबंधित कंत्राटदार मनसे कामगार संघटनेच्या वतीने केलेल्या पत्रव्यवहार व विनंतीकडे दुर्लक्ष करीत होते.
यामुळे मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, चिटणीस केतन नाईक व मनसे नेते विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे घंटागाडी कामगारांच्या वतीने दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी सहा वाजता पासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
काम बंद आंदोलन करताच नगरपालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदार कुंभकर्णी यांनी कामगारांच्या पगारामध्ये तीन हजार रुपयांनी वाढ करत असल्याचे लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पगार वाढ झाल्यामुळे मनसे कामगार सेनेने सुद्धा आंदोलन मागे घेऊन त्यांच्या विनंतीस मान दिला.
या वेळी काम बंद आंदोलनात वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ लगर ,शहर अध्यक्ष आनंद गायगोळ, प्रतीक लोखंडकार, आकाश पाटील, यश एस एन जी इंटरप्राईजेस चे अध्यक्ष एकनाथ भातखेडे, प्रदीप निमकर्डे,संतोष मांडवेकर, दिपक वरनकार, लक्ष्मण बोंबटकार, विजय ईटे, अमोल ताठे, रवी शिरसागर, सदानंद टाले, संतोष गवई, विनोद कळसकार, सुनील शिंदे,तसेच मनसे घंटागाडी कामगार अध्यक्ष विकी शिंदे सचिव विनोद पाटील, यांच्यासह शेकडो घंटागाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला होता.