बारामती : बारामती एम.आय.डी.सी.मधील श्रायबर डायनामिक्स डेअरीज प्रायव्हेट लिमिटेड (Schreiber Dynamix Dairies Private Limited) आणि श्रायबर डायनामिक्स डेअरीज एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये सातवा वेतन वाढ करार दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
कराराचा कालावधी :
सदर करार दि.1 सप्टेंबर-2021 ते दि.31 ऑगस्ट 2024 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.
वेतन वाढ :
तीन वर्षा करता सरासरी वेतनवाढ 13700/- रुपये करण्यात आली आहे. कमीत कमी 12600/- रुपये व जास्तीत जास्त 14600/- रुपये अशाप्रकारे कामाच्या कालावधी नुसार पगार वाढ करण्यात आली.
बोनस :
2021- 22 या वर्षाकरिता 51 हजार रुपये
2022-23 या वर्षाकरिता 52 हजार रुपये
2023-24 या वर्षाकरिता 53 हजार रुपये
अशाप्रकारे सर्व कामगारांना सरसकट बोनस देण्याचे मान्य करण्यात आले.
टर्म इन्शुरन्स :
सर्व कामगारांसाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढण्याचे मान्य करण्यात आले.
अनुकंपा तत्त्वावरील योजना :
एखाद्या कामगाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीस किंवा मुलांपैकी एकास कायमस्वरूपी कंपनीत कामावर घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
रात्रपाळी भत्ता :
रात्रपाळी भत्ता प्रति रात्रपाळी 40/- रुपये करण्यात आला.
शैक्षणिक कर्ज :
शैक्षणिक कर्ज निधी 4.5 लाख रुपये राखीव ठेवून 45000/- रुपये प्रत्येकी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देण्याचे मान्य करण्यात आले.
तातडीचे कर्ज :
तातडीचे कर्ज निधी 5 लाख रुपये राखीव ठेवून प्रत्येकी 25000/- रुपये बिनव्याजी देण्याचे मान्य करण्यात आले.
शोक रजा :
कामगारांचे आई-वडील यापैकी कोणाचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी एक शोकराजा देण्यात येईल.
कॅन्टीन सुविधा :
कॅंटीनच्या पदार्थांची किंमत 80 टक्के कंपनी व 20 टक्के कामगार याप्रमाणे विभागण्यात आली.
फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी :
स्वतः कामगार, पत्नी व दोन मुले यांच्यासाठी दीड लाख ते अडीच लाख रुपये अशाप्रकारे मेडिक्लेम पॉलिसी मंजूर करण्यात आली.
विवाह भेट :
कामगाराचे स्वतःचे लग्न असल्यास 10000/- (दहा हजार) रुपये गिफ्ट म्हणून देण्यात येतील.
कंपनी उत्पादित पदार्थ :
2.5 किलो तूप प्रतिमहिना प्रत्येक कामगारास देण्याचे ठरले.
बाह्य कार्य सुविधा :
जे कामगार कंपनीच्या कामानिमित्त बाहेर काम करत आहेत अशा कामगारांना प्रत्येकी 1850/- रुपये फुड अलाउन्स म्हणून देण्याचे ठरले.
सेवाजेष्ठता पुरस्कार :
कंपनीच्या माइल स्टोन ॲनिवर्सरी पॉलिसीच्या अंतर्गत कामगारांचा त्यांच्या कंपनीतील सेवेच्या ज्येष्ठतेनुसार त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरले.
या करारासाठी मार्गदर्शन श्रमिक एकता महासंघाचे मुख्य सल्लागार श्री.मारुती जगदाळे (पुणे), इंटरनॅशनल युनियन ऑफ फुड चे भारताचे कॉर्डिनेटर श्री.प्रवीण खोतकर (औरंगाबाद) तसेच राष्ट्रवादी कामगार सेल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.शिवाजीराव खटकाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदर कराराचे वेळी कंपनीच्या वतीने रिजनल मॅनेजर श्री.जितेंद्र जाधव, बिझनेस सपोर्ट मॅनेजर एच. आर.सौ.मंजुश्री चव्हाण मॅडम, एच.आर.टीम लीडर एच.आर. श्री.रावसाहेब मोकाशी, टीम ॲडव्हायझर एच.आर.मुकेश चव्हाण, प्रोडक्शन हेड श्री हनुमंत जगताप, अकाउंट हेड श्री पवन मुंदडा यांनी तर संघटनेच्या वतीने युनियनचे अध्यक्ष श्री.नानासाहेब थोरात, उपाध्यक्ष सौ.रिना केकान, सरचिटणीस श्री. संदीप बनकर, कार्याध्यक्ष श्री.सुरेश कुचेकर, खजिनदार श्री.अविनाश चांदगुडे, सहचिटणीस श्री.मनोज कारंडे, सहचिटणीस श्री.संजय गायकवाड, सह खजिनदार श्री.मन्सूर सय्यद यांनी तर साक्षीदार म्हणून संघटनेच्या वतीने श्री.गजानन भुजबळ, श्री.जालिंदर देवकाते, श्री.महेंद्र भोसले, श्री.अशोक जाधव, श्री.गिरीश देवकाते व श्री.संजय भिसे यांनी सह्या केल्या.
सदर करारा मुळे कामगार वर्गामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळाले अशी भावना कामगारांनी व्यक्त केली.
इतर वेतनवाढ करार पाहण्यासाठी :👉 क्लिक करा