मुंबई : लीलावती रुग्णालयातील मान्यताप्राप्त संघटना असलेल्या भारतीय कामगार सेनेने कामगारांची प्रलंबित वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी पाठपुरावा करत रुग्णालयाबरोबर यशस्वी वेतनवाढीचा करार केला. त्यामुळे कामगारांना सरासरी 7,200 ते 8,400 रुपयांची पगारवाढ मिळाली आहे.
वेतनवाढीचा करारनामा भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष-खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर यांनी घडवून आणला तर उपाध्यक्ष अजित साळवी यांचे करारनाम्यात मोलाचे सहकार्य लाभले. या करारामुळे लीलावतीमधील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा करारनामा 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू आहे.
कराराची वैशिष्ट्ये :
- एकूण वेतनवाढीच्या 50 टक्के रक्कम मूळ पगार व महागाई भत्त्यात वाढ
- उर्वरित 50 टक्के घरभाडे, शिक्षण भत्ता, वाहतूक भत्ता, रजा प्रवास भत्ता यामध्ये वाढ.
- याव्यतिरिक्त तंत्रज्ञ भत्त्यात व जोखीम भत्त्यातदेखील वाढ
- नैमित्तिक रजा, आजारपणाची रजा एकूण 6 रजा.
- बोनसमध्ये एकूण 0.25 टक्के वाढ करण्यात आली.
- सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या पाल्यास शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी.
करार करताना व्यवस्थापन उपाध्यक्ष अजयकुमार पांडे, कायदेविषयक सल्लागार आसिफ मुल्ला, सुभाष धुतिया जी, अमित धुतिया जी, वित्त संचालक राजेंद्र पुरोहित यांच्या समवेत करारनामा पार पडला. यावेळी संघटनेचे चिटणीस प्रमोद गावकर, कमिटी सदस्य संदीप मेटकर, प्रकाश सावंत, प्रल्हाद भिलारे, मनोहर पाटेकर, सविता सोडेवाले, हेमा मिस्त्रा, हणमंत चव्हाण, दीपमाला कांबळे आदी उपस्थित होते.