बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या सहकार्याने कामगार कर्मचारी संघर्ष युनियन तर्फे वाटप                       

कोल्हापूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व कामगार कर्मचारी संघर्ष युनियन च्या वतीने पन्नास बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला या अभियानात पंधराशे जणांची नोंदणी झाली असून त्याचा शुभारंभ कामगार युनियन प्रदेश अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते पार पडला सदर सुरक्षा पेटीत चौदा प्रकारचे साहित्य असून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण  मंडळ यांच्या सहकार्याने हा लाभ देण्यात आला. 

       सुरक्षा साधना भावी कामगारांची मृत्यू प्रमाण अधिक असल्याने सुरक्षा भेटीला महत्त्व आहे. या बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना देखील देण्यात येणार आहे असे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी बोलताना सांगितले सुरक्षा किट मध्ये सुमारे अकरा हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले या अभियानात नोंदणी झालेल्या १५०० जणांना कार्यक्रम घेऊन सुरक्षा संच वाटप करून 28 योजनाचा लाभ देणार असल्याचे पाटील म्हणाले 

     या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, अनिल कवाळे, शुभम शिरहट्टी, संग्राम जाधव, सचिन दाभाडे, अभिजीत सुतार, प्रकाश पाटील, प्रकाश पवार, विजय श्रावस्ते, चंद्रकांत बिरणगे, भारती बिरणगे, अश्विनी कांबळे, अर्चना कांबळे, नेहा कांबळे व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.