महेंद्र पासलकर यांची भाजपा कामगार आघाडी पुणे शहर 'सरचिटणीस' पदी निवड

पुणे : पुणे शहर भाजपा कामगार आघाडी सरचटणीसपदी महेंद्र पासलकर यांची निवड करण्यात आली याबाबत तसे पत्र भाजपा पुणे शहराध्यक्ष मा.आमदार जगदीशजी मुळीक, भाजपा कामगार आघाडी शहर अध्यक्ष संतोषजी कांबळे यांच्या हस्ते व भाजपा उप शहराध्यक्ष सुनीलजी मारणे यांच्या उपस्थितित देण्यात आले.

      महेंद्र पासलकर हे कामगार क्षेत्रामध्ये सन १९९३-९४ पासून काम करत असताना सुरुवातीस अल्फा लावल कंपनी, टाटा मोटर्स मध्ये काम केल्यानंतर सन १९९८ पासून थरमॅक्स कंपनी मध्ये काम करत आहेत. थरमॅक्स कामगार संघटनेमध्ये ३ वर्ष कार्याध्यक्षपदी काम केले असून कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना आदिवासी लोकांसाठी देखील कार्य केलेले आहे.

        नियुक्ती झाल्यानंतर महेंद्र पासलकर म्हणाले कि, कामगारांना न्याय मिळून देण्यासाठी भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री.चंद्रकांतदादा पाटील, भाजपा कामगार आघाडी संयोजक श्री.संजयजी केणेकर, भाजपा कामगार आघाडी प्रदेक्षाध्यक्ष श्री.गणेश ताठे, पिंपरी-चिंचवड चे माजी उपमहापौर व भाजपा कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कामगार नेते केशवरावजी घोळवे, महाराष्ट्र भाजपा कामगार आघाडी प्रदेश सचिव  बाळासाहेब टेमकर, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कामगार आघाडीच्या सह संयोजिका प्रितीताई व्हिक्टर, अध्यक्ष विजयदादा हारगुडे, भाजपा कामगार नेते हनुमंत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार वर्गासाठी कार्यरत राहणार आहे असे सांगितले.