नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (NFITU) राष्ट्रीय कार्यकारिणीवर "वरिष्ठ उपाध्यक्ष" पदावर कामगार नेते श्री.यशवंतभाऊ भोसले यांची निवड

दिल्ली - केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (NFITU)  राष्ट्रीय कार्यकारिणीवर "वरिष्ठ उपाध्यक्ष" पदावर कामगार नेते श्री.यशवंतभाऊ भोसले यांची निवड करण्यात आली.

       संघटनेच्या वतीने दिल्ली येथे लोकसभा संसदेच्या श्रममंत्रालयात दि 24 ऑगस्ट 2021 रोजी  देशातील सुमारे 38 कोटी असंघटित श्रमिकांचे प्रश्नांवर बैठक झाली. यावेळी भारत सरकार केंद्रीय श्रममंत्री श्री.भूपेंद्रजी यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, या बैठकीत देशातील असंघटित श्रमिकांची माहिती गोळा करणे, केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना त्यांचे पर्यंत पोहोचाव्यात या करिता प्रत्येक श्रमिकास "ई श्रम कार्ड" देण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले. येत्या 26 सप्टेंबर 2021 पासून देशभर हा कार्यक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले. या करिता "ई श्रम पोर्टल"चे उदघाटन देखील श्रममंत्री यांनी या बैठकीत केले.

      या वेळी बोलताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले कि, "कोविड लॉकडाऊन काळात या असंघटित लाखो कामगारांचे अतोनात हाल झाले, कित्येक मृत्युमुखी पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्षे झाली परंतु आज पर्यंत सरकारकडे करोडो असंघटित कामगारांची सविस्तर माहिती नाही ही खंत होती परंतु आता या 'ई श्रम पोर्टल' मुळे त्यांची माहीती उपलब्ध होणेस मदत होईल तसेच शासनाचे योजना त्यांचे पर्यंत पोहचवणे शक्य होईल या करिता केंद्र सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत आहे."

    या बैठकीस श्रम मंत्रालयाचे मुख्य सचिव व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते तसेच देशातील मान्यताप्राप्त 14 संघटनाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

    नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन (NFITU) अध्यक्ष डॉ.श्री.दिपकजी जैस्वाल यांनी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची निवड केली या निवडीबाबत कामगार क्षेत्रातून यशवंतभाऊ भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.