पुणे कामगार उपआयुक्त पदी श्री.अभय गिते यांची नियुक्ती

पुणे : कामगार उपआयुक्त पुणे पदी श्री.अभय गिते यांची नियुक्ती करण्यात आली याबाबत कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांनी दि.९ ऑगस्ट २०२१ रोजी शासन आदेश प्रकशित केला.

        श्री.अभय गिते हे मूळचे बीड चे आहेत. बीड येथे बारावीपर्यंतचे आणि औरंगाबाद येथे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गिते यांनी बी.फार्मसी केले आणि त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एमबीए (Human Resource) चा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर आठ वर्षे औद्योगिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ विकास विभागाचे काम पाहिले आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग मध्ये सहाय्यक कामगार आयुक्त  म्हणून प्रथम औरंगाबाद व नंतर पुणे येथे कार्यरत आहेत.

      कामगार क्षेत्रामध्ये असणारा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गिते यांची ओळख असून पूर्वी औद्योगिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ विकास विभागामध्ये काम केल्यामुळे कामगारांच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.